विशाखापट्टणम होणार देशातले पहिले कॅशलेस शहर

0
21

आंध्र प्रदेशातील किनारपट्टीवरचे शहर विशाखापट्टनम येथे येत्या 8 ऑक्टोबरपासून सर्व व्यवहार रोकडविरहीत होणार आहेत. त्यामुळे हे देशातील पहिले कॅशलेस शहर ठरणार आहे.

विशाखापट्टणम हे देशातील पहिले कॅशलेस शहर ठरणार आहे. विशाखापट्टनम येथे रोकडविरहीत व्यवहार करण्याची अंमलबजावणी करण्यासाठी व्हिसा या कार्ड पेमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंध्र प्रदेशचे माहिती तंत्रज्ञान मंत्री नारा लोकेश यांच्याशी व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. विशाखापट्टनमला कॅशलेस शहर करण्याच्या पथदर्शी प्रकल्पासाठी व्हिसा कंपनीने राज्य सरकारशी करार केला आहे. जगात हा अशा प्रकारचा पहिलाचा प्रकल्प आहे, असे म्हंटले जात आहे. विशाखापट्टनमला कॅशलेस शहर करण्याची आपली योजना मांडून व्हिसाच्या प्रतिनिधींनी त्यांना या संबंधात उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. या संबंधातील पायलट प्रकल्प यशस्वी झाल्यामुळे तो येत्या 9 ऑक्टोबरपासून पूर्णपणे सुरू होणार आहे. हा प्रकल्प देशातील अन्य शहरांसाठी एक प्रेरणा ठरेल, असा विश्वास नारा लोकेश यांनी व्यक्त केला.

 

कॅशलेस अर्थव्यवस्था :

ह्या अर्थव्यवस्थेनुसार व्यवहारासाठी कॅश/रोख रक्कम वापरण्याऐवजी इतर पर्याय वापरले जातात जसे की प्लॅस्टिक मनी, इ वॉलेट, इंटरनेट बँकिंग. ज्यामध्ये छापील नोटांचा अजिबात समावेश नसतो. या प्रकारच्या अर्थव्यवस्थेची भारताला नक्कीच गरज आहे. ही व्यवस्था मोठ्या प्रमाणात अंमलात आणणंसुद्धा शक्य आहे. भारतीयांमधील वाढलेला फोनचा वापर यासाठी अधिक उपयुक्त ठरणार आहेच! या अर्थव्यवस्थेमुळे सर्व व्यवहार बर्‍यापैकी पारदर्शक असतील, सुरक्षित असतील आणि त्यामुळं काळ्या पैशाला/गैरव्यवहारांना थांबवण शक्य आहे! ह्या व्यवस्थेनुसार व्यवहार करणंसुद्धा सोपं असल्यामुळं लवकरच याचा मोठा प्रसार होईल असे चित्र या चलनबदलाच्या निमित्ताने का होईना पण दिसू लागले आहे.   

कॅशलेस अर्थव्यवस्थेचे फायदे : 

• छापील नोटांमधून होणारे गैरव्यवहारांना आळा बसेल!
• चलन व्यवस्थापन, नोटांच्या छपाईचा सरकारी खर्च वाचेल!
• बनावट नोटा छापण्याचे प्रकार बंद होतील!
• आयकर विभागाकडे प्रत्येक व्यवहाराची नोंद होईल!
• रोख रक्कम, सुटे पैसे जवळ बाळगण्याची गरज नाही!
• धनादेश वटन्याची वाट पहावी लागणार नाही त्यामुळं सर्व व्यवहार जलद! 
• सुरक्षित व्यवहार आणि गरजेनुसार अनेक पर्याय उपलब्ध