विप्रो अध्यक्ष अझीम प्रेमजी यांना सर्वोच्च फ्रेंच नागरिक सन्मान मिळाला

0
248

28 नोव्हेंबर, 2018 रोजी बेंगलुरूमध्ये भारतीय व्यवसायी अझीम प्रेमजी यांना सर्वोच्च फ्रेंच नागरिक सन्मान चेवेलियर डी ल लेजन डी’ऑनर (नाईट ऑफ द लीजॉन ऑफ ऑनर) देण्यात आले.

विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांना फ्रान्सचे राजदूत अलेक्झांडर जिग्लर यांनी हे सन्मान दिले. भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योग, फ्रान्समधील त्यांचे आर्थिकक्षेत्रात योगदान आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन आणि अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या माध्यमातून समाजसेवा हे त्यांचे प्रशंसनीय योगदान देण्यासाठी व त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला.

ठळक वैशिष्ट्ये

• नेपोलियन बोनापार्ट यांनी 1802 मध्ये स्थापन केलेला लेजन डी’ऑनर हे सन्मान, फ्रान्सच्या उत्कृष्ट सेवेसाठी दिला जातो. ती व्यक्ती फ्रान्सचीच नागरिक असायला हवी असे नाही.
• यापूर्वी ज्या भारतीय नागरिकांना हे सन्मान दिले गेले आहे त्यात प्रसिद्ध वैज्ञानिक व भारत रत्न सी एन आर राव, स्व. तमिळ अभिनेता शिवाजी गणेशन, अभिनेता कमल हसन, बंगाली अभिनेता सौमित्र चॅटर्जी आणि बॉलीवुड सुपरस्टार शाहरुख खान यांचा समावेश आहे.
• विप्रो कंपनीचा फ्रान्ससोबतचा संबंध 15 वर्षांहून अधिक काळापासून आहे आणि कंपनीचे अनेक फ्रेंच संस्थांशी घनिष्ट संबंध आहेत.
• विप्रोसाठी फ्रान्स हे एक महत्त्वाचे बाजार आहे आणि कंपनी देशामध्ये सतत गुंतवणूकीसाठी वचनबद्ध आहे. विप्रोचे फ्रान्समधील कंपनीत जवळजवळ 65 टक्के लोक स्थानीय आहेत.

अझीम प्रेमजी बद्दल

• प्रेमजी हे भारतीय उद्योजक, गुंतवणूकदार आणि समाजसेवी व विप्रो लिमिटेडचे ​​अध्यक्ष आहेत.
• त्यांना अनौपचारिकपणे भारतीय आयटी उद्योगाचा राजा म्हणून ओळखले जाते. विप्रोला चार दशकांपासून मार्गदर्शन देत आज सॉफ्टवेअर उद्योगातील जागतिक नामांपैकी एक म्हणून तयार करण्यामागे ते जबाबदार आहेत.
• 2010 मध्ये, प्रेमजी यांना आशियावीकने जगातील 20 सर्वात शक्तिशाली पुरुषांमध्ये सामील केले होते. 2004 आणि 2011 मध्ये TIME मॅगझिनने 100 प्रभावशाली लोकांमध्ये त्यांना सामील करण्यात आले होते.
• विप्रोमध्ये प्रेमजी यांची 73% हिस्सेदारी आहे आणि त्यांचे खासगी इक्विटी फंड, प्रेमजी इन्व्हेस्ट त्यात त्यांची 2 अब्ज अमेरिकन डॉलर्सची वैयक्तिक संपत्ती देखील आहे.
• सध्या ते मुकेश अंबानी नंतर भारतातील दुसरे श्रीमंत व्यक्ती आहेत.
• 2013 मध्ये, ‘The Giving Pledge’ द्वारे त्यांनी आपली कमीतकमी अर्ध संपत्ती जमा करण्यास मान्यता दिली. भारतात शिक्षा क्षेत्रात मदत करणाऱ्या अझीम प्रेमजी फाऊंडेशनला 2.2 बिलियन डॉलर्स देणगी देऊन त्यांनी याची सुरुवात केली.
• अजीम प्रेमजी फाऊंडेशन हे 2001 मध्ये प्रेमजी यांनी स्थापन केलेली एक विना-नफा संस्था आहे जी सार्वभौमिक शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान देते. ग्रामीण भागात शालेय शिक्षण गुणवत्ता सुधारण्यासाठी या संस्थेने मोठ्या प्रमाणात काम केले आहे.
• 2005 मध्ये, भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि 2011 मध्ये देशाचे दुसरे सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. त्यांना मैसूर विद्यापीठकडून 2015 मध्ये मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आले.