विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

0
25

दिवंगत भाजप खासदार व अभिनेते विनोद खन्ना यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. ते या पुरस्काराचे 49 वे प्राप्तकर्ता आहेत.

दिवंगत अभिनेता विनोद खन्‍ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे. ते या पुरस्काराचे 49 वे प्राप्तकर्ता आहेत. याव्यतिरिक्त, 65 व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे सुवर्णकमळ ‘विलेज रॉकस्टार’ या आसामी चित्रपटाने पटकावला आहे.

दादासाहेब फाळके पुरस्कार

दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणार्‍या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. इ.स. 1969 मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे. हा पुरस्कार भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी खात्यातर्फे दिला जातो. दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयादरम्यान ह्या पुरस्काराचे वाटप केले जाते. पुरस्कारामध्ये सुवर्ण कमळ स्मृतीचिन्ह, 10 लाख रुपये रोख आणि एक शाल यांचा समावेश आहे.