विद्यापीठ उपकेंद्रात आता स्थानिक गरजांनुसार अभ्यासक्रम

0
22

स्थानिक गरजांनुसार आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्याच्या उपकेंद्र अहमदनगर व नाशिकमध्ये अभ्यासक्रम सुरू करणार आहे.

नाशिकमध्ये द्राक्षांचे उत्पादन सर्वाधिक आहे, म्हणून द्राक्षांशी संबधित पदार्थ आणि वस्तू, तर पैठणी लोकप्रिय आहे म्हणून त्यावर आधारित अभ्यासक्रम अशा स्थानिक गरजांनुसार आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्याच्या उपकेंद्र अहमदनगर व नाशिकमध्ये अभ्यासक्रम सुरू करणार आहे.

प्रत्येक उपकेंद्रांमध्ये जवढ्या शाखा सुरू आहेत, त्यातील प्रत्येक शाखेत आम्ही एक अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेणार आहेत. तेथील स्थानिकांच्या गरजा, विद्यार्थ्यांच्या गरजा, बाजाराची गरज यानुसार कोर्सेस सुरू करण्यात येतील.