विजय रूपानी सलग दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी

0
19

सलग सहाव्यांदा गुजरात जिंकणाऱ्या भाजपने पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदासाठी विजय रूपानी यांना संधी दिली असून, रूपानी यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, नितीन पटेल हेदेखील उपमुख्यमंत्रिपदी कायम राहिले.

# गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, अनेक केंद्रीय मंत्र्यांसह एनडीएशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री देखील या शपथविधी सोहळ्यात सहभागी झाले होते.

# मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांच्यासह १९ मंत्री शपथ घेतली आहे. ६ पाटीदार आणि ६ ओबीसी चेहऱ्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.

# गांधीनगर येथील सचिवालयात गुजरातमधील नव्या सरकारचा शपशविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. येथे विजय रुपाणी हे गुजरातचे मुख्यमंत्री तर नितिन पटेल हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. रुपाणी यांना गुजरातचे राज्यपाल ओपी कोहली हे मुख्यमंत्री पदाची शपथ देतील. 

# मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासोबत त्यांचे संपूर्ण मंत्रीमंडळ देखील शपथ घेणार आहे. रूपाणी यांच्या मंत्रिमंडळात काही नवे चेहरे देखील पाहायला मिळणार आहेत.

# नारानपुरा विधानसभेतून निवडून आलेले आमदार कौशिक पटेल यांना विजय रुपाणी यांच्या मंत्रिमंडळात जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच आर. सी. फलदु, परबत पटेल, हितु कनोडिया, पंकज देसाई, पुर्णेश मोदी, निमा आर्चार्या, सौरभ पटेल आणि धर्मेंद्र सिंह जाडेजा या नव्या चेहऱ्यांना देखील मंत्रीमंडळात जागा मिळण्याची शक्यता आहे.