वास्तूविशारद बाळकृष्ण दोशी यांना प्रित्झकर पुरस्कार जाहीर

0
26

सुप्रसिद्ध वास्तुविशारद बाळकृष्ण दोशी यांना वास्तुविशारदातील नोबेल पुरस्कार म्हणून गणला जाणारा प्रतिष्ठेचा यंदाचा प्रित्झकर पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळविणारे ते पहिलेच भारतीय ठरले आहेत.

# बाळकृष्ण दोशी यांना वास्तुविशारदातील नोबेल पुरस्कार म्हणून गणला जाणारा प्रतिष्ठेचा यंदाचा प्रित्झकर पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळविणारे ते पहिलेच भारतीय ठरले आहेत.

# टोरांटोमधील आगा खान संग्रहालयातील होणाऱ्या एका सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. पुरस्कार स्वरूपात १ लाख डॉलर्स म्हणजेच ६५ लाख रुपये रोख मिळतील.

# ६० वर्षाहून अधिक काळापासून सेवा आणि योगदान देणारे बाळकृष्ण दोशी हे वास्तुविशारद आहेत. 

प्रित्ज़कर पुरस्कार :

हा पुरस्कार विश्वस्तरीय दर्जाचे योगदान देणाऱ्या वास्तुकाराला दिला जातो. वास्तुकलेच्या नोबल पुरस्काराच्या रुपात प्रसिद्ध असलेला हा पुरस्कार 1979 पासून हा पुरस्कार प्रदान केला जातो. या पुरस्काराची स्थापना जे. प्रित्ज़कर यांच्या द्वारे केली गेली होती. हा पुरस्कार प्रित्ज़कर कुटुंब आणि हयात फाऊंडेशनने दिला आहे प्रथम ‘प्रित्ज़कर’ पुरस्कार वर्ष 1979 मध्ये ग्लास हाउसचे वास्तुकार फिलीप जोंसनला दिला गेला होता.