वाय. सी. मोदी नवे एनआयए प्रमुख

0
21

वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. सी. मोदी यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मोदी हे विद्यमान प्रमुख शरद कुमार यांची जागा घेतील. कुमार यांचा कार्यकाळ ३० ऑक्टोबर रोजी संपणार आहे. मोदी यांची एनआयएच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आल्याचे डीओपीटी विभागाने म्हटले आहे. ते ३१ मे २०२१ पर्यंत या पदावर असतील.

१९८४ च्या आसाम-मेघालय बॅचचे आयएएस अधिकारी मोदी सध्या सीबीआयचे विशेष महासंचालक आहेत. गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलीनंतर सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकामध्ये मोदींचा समावेश होता. गोध्रा जळीतकांडानंतर घडलेल्या तीन महत्वाच्या प्रकरणांचा तपासही वाय. सी. मोदी यांनी केला आहे. यामध्ये गुलबर्ग सोसायटी, नरोडा पाटिया आणि नरोडा गाम येथील हिंसाचार प्रकरणांचा समावेश आहे. तसेच सीबीआयमध्ये नियुक्तीपूर्वी त्यांनी शिलॉंग येथे अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणून काम पाहिले आहे. (वृत्तसंस्था)