वर्ल्ड स्टील असोसिएशनचे खजिनदार पदी सज्जन जिंदाल यांची निवड

0
198

JSW स्टीलचे सीएमडी सज्जन जिंदाल 18 ऑक्टोबर 2018 रोजी वर्ल्ड स्टील असोसिएशन (वर्ल्डस्टील) चे खजिनदार म्हणून निवडून आले. असोसिएशनने टाटा स्टीलचे एमडी टीव्ही नरेंद्रन आणि आर्सेलर मित्तलचे मुख्य एलएन मित्तल यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.

जपानच्या टोयको येथील वर्ल्ड स्टीलच्या सामान्य सभेत ही नियुक्ती करण्यात आली, या सभेत संचालक मंडळाने 2018-19 च्या काळासाठी नवीन अधिकारी सुद्धा निवडले.
नवीन अधिकारी एक वर्षाच्या कालावधीसाठी निवडून आले आहेत.

वर्ल्ड स्टील असोसिएशन
• वर्ल्ड स्टील असोसिएशन (वर्ल्डस्टील) ही एक विना – नफा संस्था आहे ज्याचे मुख्यालय बेल्जियममधील ब्रुसेल्स येथे आणि दुसरे कार्यालय चीनमधील बीजिंग येथे आहे.
• जुलै 1967 मध्ये आंतरराष्ट्रीय आयर्न अँड स्टील इंस्टीट्यूट म्हणून याची स्थापना केली गेली. ऑक्टोबर 2008 मध्ये त्याचे नाव बदलून वर्ल्ड स्टील असोसिएशन असे करण्यात आले.
• हे जगातील 160 पेक्षा जास्त स्टील उत्पादक (जगातील 10 सर्वात मोठी स्टील कंपन्यामधून 9 धरून), राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्टील उद्योग संघटना आणि स्टील संशोधन संस्थांचे प्रतिनिधीत्व करते.
• जागतिक स्तरावर 85 टक्के जागतिक स्टील उत्पादक वर्ल्डस्टील मध्ये समाविष्ट आहेत.
• असोसिएशनने 2017 मध्ये 50 वा वर्धापन दिन साजरा केला.