‘वर्ड ऑफ दि इयर’ – ‘फेक न्यूज’

0
12

अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लोकप्रिय केलेल्या ‘फेक न्यूज’ (Fake News) या शब्दाचा जगभरात वाढलेला वापर पाहता कॉलिन्स डिक्शनरीने या शब्दाला ‘वर्ड ऑफ दि इयर’ जाहीर केले आहे.

# ‘फेक न्यूज’ (Fake News) या शब्दाचा वापर गेल्या बारा महिन्यांमध्ये तब्बल ३६५ पटींनी वाढल्याचे ब्रिटनमधील शब्दकोषकारांना आढळले. ट्रम्प यांनी सन २०१६ च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीमध्ये वारंवार या शब्दाचा वापर केल्यामुळे प्रसारमाध्यमांमधूनही या शब्दाचा होणारा उल्लेख वाढला. ‘वार्तांकनाच्या आड राहून पसरवली जाणारी चुकीची आणि सनसनाटी माहिती’ अशी या शब्दाची व्याख्या करण्यात आली आहे.

# ‘फेक न्यूज’सोबत ‘वर्ड ऑफ दि इयर’च्या शर्यतीमध्ये ‘ब्रेक्झिट’हा शब्दही होता. जून २०१६ मध्ये ब्रिटनने युरोपियन महासंघातून (ईयू) बाहेर पडण्यासाठी घेतलेल्या जनमताला ‘ब्रेक्झिट’ असे संबोधण्यात आले होते. तथापि, ‘ब्रेक्झिट’पेक्षा ‘फेक न्यूज’चा वापर अधिक असल्याचे आढळले.

# ‘विधान; तसेच आरोप म्हणून केला जाणारा ‘फेक न्यूज’ या शब्दाचा वापर वाढला असून, हा शब्द समाजाचा वार्तांकनावरील विश्वास कमी करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे,’ असे कॉलिन्स डिक्शनरीच्या भाषिक आशय विभागाच्या प्रमुख हेलेन न्यूस्टेड यांनी सांगितले.
 
# अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक प्रक्रियेमध्ये रशियाने हस्तक्षेप केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांकडून प्रसिद्ध केले जात असताना ट्रम्प यांनी त्यावर ‘फेक न्यूज’चा कारखाना जोमाने काम करत आहे,’ अशा शब्दांत पलटवार केला होता. ट्रम्प यांच्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे आणि विरोधी पक्षनेते जेरेमी कॉर्बिन यांनीही हा शब्द वापरला होता.
 
याआधी कॉलिन्स डिक्शनरीमधील ऑफ दि इयर’   :
 
2016 -ब्रेक्सिट  (Brexit)
 
2015 -बींग -वॉच (Binge-watch)
 
2014 – फोटोबॉंब (Photobomb)
 
2013 – गिक (Geek)