लोकसभा निवडणूक 2019 : 23 मे रोजी निकाल, 7 टप्प्यांत

0
233

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं. सतराव्या लोकसभेसाठी सात टप्प्यांत मतदान होईल.11 एप्रिलला मतदानाचा पहिला टप्पा पार पडेल. दुसऱ्या टप्पा 18 एप्रिलला, तिसरा टप्पा 23 एप्रिलला पार पडेल. चौथ्या टप्प्यासाठी 29 एप्रिलला मतदान होईल तर पाचव्या टप्प्यातील मतदान 6 मे रोजी होईल. सहावा टप्प्यासाठी 12 मे आणि सातव्या टप्प्यासाठी 19 मे रोजी मतदान होईल.

मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. सोळाव्या लोकसभेचा कालावधी 3 जूनला संपुष्टात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात 20 राज्यांतील 91 मतदारसंघात मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यांतील 97 मतदारसंघ, तिसऱ्या टप्प्यात 14 राज्यांतील 115 मतदारसंघ तर चौथ्या टप्प्यात 9 राज्यांतील 71 मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल. पाचव्या टप्प्यांत 7 राज्यांतील 51 मतदारसंघ, सहाव्या टप्प्यांत 7 राज्यांतील 59 मतदारसंघ आणि सातव्या टप्प्यांत 8 राज्यांतील 59 मतदारसंघात मतदान घेतलं जाईल.

महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. महाराष्ट्रात 11 एप्रिलला 7 मतदारसंघात, 18 एप्रिलला 10 मतदारसंघात, 23 एप्रिलला 14 मतदारसंघात तर 29 एप्रिलला 17 मतदारसंघात मतदान होईल.