लोकसभा निवडणुका 2019 प्रथम चरण – उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रसह 91 मतदारसंघांमध्ये पहिले चरण सुरू

0
202

आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, मणिपूर, ओडिशा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील काही लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान आज होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये, 80 पैकी 8 जागांवर सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान आज होणार आहे.

• लोकसभा निवडणुक 2019 ची सुरुवात 11 एप्रिल 2019 रोजी पहिल्या चरणसोबत सुरु झाल्या आहेत.
• प्रथम चरणात लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी 91 जागासाठी मतदान होईल. या जागा एकूण 18 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील आहेत.
• आंध्रप्रदेश, तेलंगाना, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्किम, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप आणि उत्तराखंडमधील सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे.
• आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, मणिपूर, ओडिशा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील काही लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे.
• उत्तर प्रदेशमध्ये, 80 पैकी 8 जागांवर सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मुख्य मतदारसंघांमध्ये सहारनपूर, कैराना, गाजियाबाद, बागपत आणि गौतम बुद्ध नगर या पश्चिम उत्तर प्रदेशची जागा समाविष्ट आहे.

लोकसभा निवडणूकीचे पहिले चरण 2019 : महत्त्वाचे मुद्दे

• लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चरणात 1297 उमेदवारांचा निर्णय घेण्यासाठी 14 कोटी 20 लाख आणि 54 हजार मतदार मतदान करण्याची अपेक्षा आहे.
• सुमारे 7700 तिसऱ्या लिंगाचे (थर्ड जेंडर) मतदार मतदान करतील.
• 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1 लाख 70 हजार मतदान केंद्रे स्थापन केली गेली आहेत.
• आज निवडणुकीसाठी उभे असलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये पाच केंद्रीय मंत्री – नितीन गडकरी (नागपूर), किरन रिजीजू (अरुणाचल पश्चिम), जनरल व्हीके सिंग (गाजियाबाद), सत्यपाल सिंग (बागपत) आणि महेश शर्मा (गौतम बुद्ध नगर) यांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणुका :

• त्याचवेळी आंध्र प्रदेश, सिक्किम आणि अरुणाचल प्रदेशच्या सर्व आणि ओडिशातील 147 पैकी 28 जागांसाठी विधानसभा निवडणुका होणार आहेत.