लेबेनानच्या पंतप्रधानांचा राजीनामा

0
17

लेबेनानचे पंतप्रधान साद हारिरी यांनी आज अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी राजीनामा दिल्याने देशात प्रादेशिक तणावाबरोबर अचानक अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रियाध येथून हरिरी यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.

# रियाध येथून हरिरी यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. या संदेशामध्ये हरिरी यांनी इराणवर आणि लेबानी हिझबुल्लाह गटावर जोरदार टीका केली.

# हे गट अरबांच्या व्यवहारामध्ये हस्तक्षेप करत आहेत असा आरोप त्यांनी केला. आपल्या भूभागात पसरलेले इराणचे हात तोडून टाकण्यात येतील, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.

# हरिरी यांचे वडील आणि माजी पंतप्रधान रफीक हरिरी यांची 2005 मध्ये हत्या झाली होती. त्यानंतर 2016 साली हरिरी यांना पंतप्रधान म्हणून नियुक्‍त करण्यात आले होते. त्यांच्या मंत्रिमंडळात शिया दहशतवादी संघटना हिझबुल्लाचे प्रतिनिधीही होते.

# सीरियातील यादवीचा परिणाम लेबानानमध्ये होऊ न देण्यापासून आपल्या देशाला त्यांनी यशस्वीपणे वाचवले होते. त्यानंतर सौदी अरेबियाशी निष्ठा असणारा हरिरी यांच्या नेतृत्वाखालील सुन्नी गट आणि इराणला जवळचा मानणारा हिज्बुल्लाहचा गट असे दोन गट देशामध्ये उभे ठाकले.

# जीवाला धोका असल्याच्या कारणाने हरिरी यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे आता लेबानानमध्ये यादवी होणार अशी स्पष्ट चिन्हे निर्माण झाली आहे.