रोनाल्डो पाचव्यांदा बॅलन डी ऑर विजेता

0
19

सर्वोत्तम फुटबॉलपटूसाठी दिला जाणारा फुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा ‘बॅलन डी ऑर’ हा पुरस्कार ख्रिस्तियानो रोनाल्डोने पटकावला.

# बत्तीस वर्षीय रोनाल्डोने सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार जिंकला. यावर्षीच्या पुरस्कारासाठी रोनाल्डो, मेस्सी आणि नेमार यांच्यामध्ये शर्यत होती. त्यापैकी रोनाल्डोला सर्वाधिक मते मिळाली, तर मेस्सी आणि नेमार यांना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

# मागील मोसमामध्ये रोनाल्डोने चॅम्पियन्स लीग स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याबरोबरच रियाल माद्रिदने या स्पर्धेचे सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावण्यामध्येही महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने मागील मोसमात सर्व स्पर्धांमध्ये मिळून ४२ गोल नोंदवले. त्याचप्रमाणे युरोपियन वर्ल्ड कप पात्रता फेरीमध्येही त्याने १५ गोल केले.

# मागील दहा वर्षांत या पुरस्कारवर मेस्सी आणि रोनाल्डोचे वर्चस्व राहिले आहे. यावरून या दोन्ही खेळाडूंच्या फुटबॉलमधील योगदानाची कल्पना येते. रोनाल्डो पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत पोर्तुगाल संघाचे नेतृत्व करणार आहे.

पुरस्कार मिळवलेले वर्ष

2008, 2013, 2014, 2016, 2017

42 ख्रिस्तियानो रोनाल्डो याने रिअल माद्रिद क्‍लबसाठी गेल्या हंगामात 42 गोल नोंदवलेे आहेत. 

15 युरोपियन वर्ल्डकप पात्रता फेरीत रोनाल्डोने पोर्तुगालसाठी 15 गोल नोेंदवले आहेत.

ख्रिस्तियानो रोनाल्डो याने पाचवेळा पटकावला प्रतिष्ठेचा बॅलन डी ऑर पुरस्कार