रिचर्ड थेलर यांना अर्थशास्त्राचे नोबेल

0
26

‘वर्तनाधारित अर्थशास्त्र’ असा सिद्धांत मांडणारे अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थेलर (७२) यांना यंदाचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे.

अमेरिकेचे अर्थतज्ञ डॉ. रिचर्ड एच. थॅलर यांना सोमवारी नोबेल पुरस्कार जाहीर झाला. अर्थशास्त्राचा मानसशास्त्राrय दृष्टीकोनातून विश्लेषणात्मक अभ्यास करून त्यांनी आधुनिक अर्थशास्त्रामध्ये मोलाची भर घातली आहे. याचा परिणाम अर्थशास्त्रातील संशोधन आणि धोरणांवरही झाला आहे, अशा शब्दात पुरस्कार निवड समितीने त्यांच्या संशोधनाचा गौरव केला आहे. सुमारे ७२ कोटी रुपयांचे हे पारितोषिक ‘अंडरस्टँडिंग द सायकॉलॉजी ऑफ इकॉनॉमिक्स’ या प्रबंधासाठी देण्यात येणार आहे.

मानवी स्वभावाचा व्यक्तीच्या आर्थिक निर्णयांवर आणि बाजाराच्या उलाढालीवर कसा परिणाम होतो, हे थेलर यांनी दाखवून दिले. थेलर हे वर्तनाधारित अर्थशास्त्राचे जनक आहेत. या शाखेत मानवी वर्तनाचा अर्थशास्त्रावर होणारा परिणाम अभ्यासला जातो. एखादी व्यक्ती आर्थिक निर्णय घेताना कसा विचार आणि वर्तन करते याचे विश्लेषण या शाखेत केले जाते. थेलर अमेरिकेतील शिकागो विद्यापीठात प्राध्यापक आहेत.

७२ वर्षीय डॉ. रिचर्ड यांचे वर्तणुकविषयक अर्थशास्त्रामधील संशोधन महत्त्वपूर्ण मानले जाते. त्याची आज विविध क्षेत्रांमधील योजनांच्या अंमलबजावणीमध्ये प्रभावी ठरले आहे. डॉ. थॅलर हे शिकागो विद्यापीठातील बूथ स्कूल ऑफ बिझनेस येथे  प्राफेसर आहेत. २००८ मध्ये प्रकाशित सर्वाधिक खपाच्या ‘नज्’ या पुस्तकाचे ते सहलेखकही आहेत.