राहुल द्रविडचा आयसीसीच्या Hall of Fame मध्ये समावेश

0
203

भारतीय फलंदाजीची भिंत म्हणून कारकीर्द चमकावणारा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याला ICC च्या Hall of Fame मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांच्या हस्ते राहुल द्रविडला हा सन्मान देण्यात आला.
क्रिकेट जगातील हा एक प्रतिष्ठेचा सन्मान आहे. हा सन्मान मिळवणारा राहुल द्रविड पाचवा भारतीय खेळाडू आहे.
याआधी बिशन सिंग बेदी, सुनिल गावस्कर, कपिलदेव आणि अनिल कुंबले यांचा या यादीत समावेश झाला आहे.
राहुल द्रविड व्यतिरिक्त, ऑस्ट्रेलियाचा माजी कप्तान रिकी पोंटिंग आणि ईंग्लंडची महिला खेळाडू क्लेर टेय्लर यांना हा सन्मान देण्यात आला.
या यादीत समाविष्ट होण्याआधी खेळाडूने क्रिकेट पासून वेगळे असल्याचे 5 वर्ष पूर्ण केले पाहिजे अशी अट आहे.