राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे १८ वे अध्यक्ष

0
18

काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आज दुपारी काँग्रेसकडून अधिकृतरित्या राहुल गांधींच्या नावाची घोषणा करण्यात आली. १६ डिसेंबरला राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

16 डिसेंबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदी निवडीचे प्रमाणपत्र राहुल यांना सोनिया यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहे. सोनिया गांधी यांनी 19 वर्षे काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच एखाद्या व्यक्‍तीने इतक्या दीर्घकाळ पक्षाचे अध्यक्षपद भूषवले आहे. 

1978 पासून काँग्रेसचे अध्यक्षपद

# नेहरू-गांधी कुटुंबाने काँग्रेसला आतापर्यंत पाच अध्यक्ष दिले आहेत. राहुल गांधी हे सहावे अध्यक्ष ठरले आहेत.

# मोतीलाल नेहरू 1919 साली पक्षाचे अध्यक्ष बनले. त्यानंतर मोतीलाल नेहरू यांचे चिरंजीव आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडे 1929 साली ही धुरा देण्यात आली.

# तिसर्‍या पिढीत 1959 साली दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पहिल्यांदा पक्षाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. 1974 ते 1984 या काळात त्यांनी पक्षाध्यक्ष म्हणून काम पाहिले. इंदिरा गांधी यांच्यानंतर राजीव गांधी यांनी पक्षाची सर्व सूत्रे सांभाळली.

# 1991 साली राजीव गांधी यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा सलग सात वर्षे नरसिंह राव आणि सीताराम केसरी यांच्याकडे होती.

# 1998 साली सोनिया यांची निवड करण्यात आली आणि पुन्हा एकदा नेहरू-गांधी कुटुंबीयांकडे काँग्रेसचे अध्यक्षपद आले.

# नेहरू-गांधी कुटुंबात पक्षाध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांनी सर्वात जास्त काळ कामकाज पाहिले आहे.