राष्ट्रीय विज्ञान दिवस: 28 फेब्रुवारी

0
49

प्रसिद्ध शास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संपूर्ण भारतात 28 फेब्रुवारी रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या माध्यमातून देशातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांच्या दैनंदिन जीवनात वैज्ञानिक अनुप्रयोगांचे महत्त्व याविषयी संदेश पसरविण्यासाठी प्रयत्न केले जातात.

यावर्षी ‘शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान (सायन्स अँडटेक्नोलॉजी फॉर सस्टेनेबल फ्यूचर)‘ या विषयाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. 

या दिवसाचे महत्त्व :

# राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या माध्यमातून देशातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांच्या दैनंदिन जीवनात वैज्ञानिक अनुप्रयोगांचे महत्त्व याविषयी संदेश पसरविण्यासाठी प्रयत्न केले जातात.

# मानव कल्याणासाठी विज्ञानाच्या क्षेत्रात होणारी कार्ये, प्रयत्न आणि यश यांचे प्रदर्शन मांडले जाते.

# सर्व संबंधित मुद्द्यांवर आणि विज्ञानाच्या विकासासाठी नवीन तंत्रज्ञान अंमलात आणण्याविषयी चर्चा केली जाते.

# वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणार्‍या देशातील नागरिकांना संधी प्रदान केली जाते.

# लोकांना यासंबंधी प्रोत्साहित केले जाते तसेच विज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रचार केला जातो.

“राष्ट्रीय विज्ञान दिवस” – पार्श्वभूमी व इतिहास

# राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान संपर्क परिषदेने (NCSTC) 1986 साली भारत सरकारला 28 फेब्रुवारी हा दिवस “राष्ट्रीय विज्ञान दिवस” म्हणून साजरा केला जावा यासाठी प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाच्या मंजूरीनंतर भारतात 28 फेब्रुवारी 1987 रोजी पहिला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.

# डॉ. सी. व्ही. रमण यांना त्यांच्या रमन इफेक्ट सिद्धांतासाठी 1930 साली भौतिकशास्त्रातले नोबेल पारितोषिक देण्यात आले. “प्रकाशाचे फोटॉन किंवा क्वांटम (प्रकाश मोजण्याचे प्रमाण) यांना त्यांच्या ऊर्जेच्या उच्च पातळीवर घेऊन गेल्यास प्रकाश किरणे विखंडीत होऊन फैलावतात” हा सिद्धांत आणि त्याचे विश्लेषण आणि प्रमाणीकरण व त्यामधील सुधारणा यांचा घन, द्रव आणि वायू तसेच त्यांच्या घटकांचे विश्लेषण करण्यासाठी वापरले जातात.