राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुष्मिता देव

0
15

सुष्मिता देव यांची अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या नव्या अध्यक्षा म्हणून शनिवारी नियुक्ती करण्यात आली. सिल्चरच्या काँग्रेस खासदार सुष्मिता देव यांची अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या नव्या अध्यक्षा म्हणून शनिवारी नियुक्ती करण्यात आली. महिला काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षा शोभा ओझा यांच्या जागेवर आता देव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

देव आणि ओझा या सध्या काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत. ओझा यांची ऑगस्ट २०१३ मध्ये महिला काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सुष्मिता देव यांच्या नावावर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिक्कामोर्तब केले.

सुष्मिता देव या माजी केंद्रीय मंत्री संतोष मोहन देव यांच्या कन्या आहेत. त्या आसाममधील सिल्चर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. देव या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या निकटच्या सहकारी आहेत. महिला आघाडीची फेररचना करण्याचा एक भाग म्हणून हा बदल आहे.

मोहन प्रकाशांऐवजी बाबरिया प्रभारी

काँग्रेसने मध्य प्रदेशांत संघटनात्मक बदल केले असून मोहन प्रकाश यांच्याऐवजी दीपक बाबरिया यांची अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस आणि मध्य प्रदेशचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्षपद अद्यापही रिक्त असून या पदासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. पुढील वर्षांच्या अखेरीला मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.