राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेत सुशीलकुमारला सुवर्णपदक

0
31

आॅलिम्पिकमध्ये दोनदा पदक जिंकणारा आणि तीन वर्षांनंतर पुनरागमन करणारा दिग्गज मल्ल सुशील कुमारने राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिपच्या पुरुषांच्या ७४ किलो वजन गटातील फ्री स्टाइल प्रकारात सुवर्ण पटकावले.

आॅलिम्पिकमध्ये दोनदा पदक जिंकणारा आणि तीन वर्षांनंतर पुनरागमन करणारा दिग्गज मल्ल सुशील कुमारने राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिपच्या पुरुषांच्या ७४ किलो वजन गटातील फ्री स्टाइल प्रकारात सुवर्ण पटकावले. एकमेव आॅलिम्पिक पदक विजेती महिला मल्ल साक्षी मलिक आणि दबंग गर्ल गीता फोगट यांनीही आपआपल्या गटात सुवर्ण कमाई केली.

सुशील कुमार

सुशील कुमार (जन्म मे २६,१९८३) हा एक भारतीय कुस्तीपटू आहे. २०१२ उन्हाळी लंडन ऑलिंपिक खेळात त्याने ६६ किलो फ्रीस्टाईल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. कुस्तीमध्ये रौप्य पदक जिंकणारा तसेच सलग दोन ऑलिंपिक खेळात वैयक्तिक पदक जिंकणारा तो पहिला भारतीय आहे. २०१० मध्ये मॉस्कोत झालेल्या विश्व कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ६६ किलो फ्रीस्टाईल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले तसेच २००८ बीजिंग ऑलिंपिक स्पर्धेत पुरुष  फ्रीस्टाईल ६६ कि.ग्रा. विभागात कांस्यपदक पटकावले. कुमारने कझाकस्तानच्या लियोनिद स्पिरिदोनोवला रिपिचेज फेरीत हारवून कांस्यपदक पटकावले. भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रा ने पुरुष १० मीटर एर रायफल मध्ये मिळवलेले सुवर्णपदक तसेच बॉक्सर विजेंदर कुमार ने मिडलवेट प्रकारात मिळवलेले कांस्यपदकानंतरचे हे भारतासाठी बीजिंग स्पर्धेतील हे तिसरे पदक होते. खाशाबा जाधव यांनी १९५२ हेलसिंकी ऑलिंपिक मध्ये मिळवलेल्या कांस्यपदकानंतरचे ऑलिंपिक कुस्तीतील हे पहिलेच पदक आहे. जुलै २००९ मध्ये सुशिल कुमार यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार ह्या पुरस्काराने भारत सरकारने संन्मानित केले.