राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

0
23

चित्रपट क्षेत्रातील विविध विभागांसाठी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. 3 मे 2018 रोजी हे सर्व पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

सर्वोत्कृष्ट चित्रपट (भाषेनिहाय)

# सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – कच्चा लिंबू

# सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – न्यूटन (निर्माता अमित मसुरकर)

# सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट- गाझी

# सर्वोत्कृष्ट लद्दाखी चित्रपट- वॉकिंग विद द विंड

# सर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपट- टू लेट

# सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट- मयूरक्षी

# सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट- हेब्बत रामाक्का

# सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट- थोंडीमुथलम दृक्शियम

# सर्वोत्कृष्ट ओरिया चित्रपट- हॅलो आर्सी

# सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट- दह..

# सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट- इशू

मराठी चित्रपट

# सर्वोत्कृष्ट बालचित्रपट – म्होरक्या

# स्पेशल मेन्शन (फीचर फिल्म) – म्होरक्या – यशराज कऱ्हाडे

# सर्वोत्कृष्ट संकलन – मृत्युभोग

# सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (लघुपट) – नागराज मंजुळे (पावसाचा निबंध)

# सर्वोत्कृष्ट लघुपट (नॉन फीचर) – मयत (सुयश शिंदे)

# सर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट – चंदेरीनामा (राजेंद्र जंगले)

# नर्गिस दत्त पुरस्कार (फीचर फिल्म) – धप्पा (निपुण धर्माधिकारी)

अन्य पुरस्कार

दादासाहेब फाळके पुरस्कार – विनोद खन्ना (मरणोत्तर)

# सर्वोत्कृष्ठ अभिनेता – अक्षय कुमार (रूस्तम चित्रपटासाठी)

# सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – श्रीदेवी (मॉम)

# सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – दिव्या दत्ता (इरादा)

# सर्वोत्कृष्ट साहसी दृश्यं – अब्बास अली मोगल (बाहुबली 2)

# सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स – बाहुबली 2

# सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन – गणेश आचार्य (गोरी तू लठ मार – टॉयलेट एक प्रेम कथा)

# स्पेशल मेन्शन (फीचर फिल्म) – अभिनेता पंकज त्रिपाठी (न्यूटन)

# सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर- ए.आर. रहमान (मॉम)

# ‘न्यूटन’ चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेते पंकज त्रिपाठी यांना राष्ट्रीय पुरस्कार

# सर्वोत्कृष्ठ अॅनिमेशन चित्रपट – फिश करी

# सर्वोत्कृष्ठ चित्रपट (नॉन फिचर) – वॉटर बेबी

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा भारतीय चित्रपट सृष्टीत भारत सरकारकडून दिला जाणारा प्रतिष्ठित असा प्रमुख पुरस्कार आहे. हे पुरस्कार 1954 सालापासून दिले जात आहेत. सुवर्ण कमळ आणि रजत कमळ असे दोन पुरस्कार सर्वोत्कृष्ट  चित्रपटाना देण्यासोबतच बाकीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चित्रपटाच्या इतर कलात्मक आणि तांत्रिक अंगांसाठी दिले जातात.

दादासाहेब फाळके पुरस्कार 

दादासाहेब फाळके पुरस्कार चित्रपट उद्योगामध्ये भारताचा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाढ आणि विकासामधील उल्लेखनीय योगदानाकरिता भारत सरकारद्वाकडून दिला जातो. पुरस्कारामध्ये सुवर्ण कमळ स्मृतीचिन्ह, 10 लाख रुपये रोख आणि एक शाल यांचा समावेश आहे. हा पुरस्कार प्रथम 1969 मध्ये सादर करण्यात आला.