राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीचे ‘न्या. मुद्‌गल’ अध्यक्ष

0
210

भारतीय क्रीडाक्षेत्रातील द्रोणाचार्य आणि ध्यानचंद या सर्वोच्च पुरस्कारांसाठी 11 सदस्यांच्या निवड समितीची घोषणा करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी न्या. मुद्‌गल यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. न्या. मुद्‌गल यांनी यापूर्वी आयपीएलमधील स्पॉट फिक्‍सिंग प्रकरणाच्या चौकशी समितीचे नेतृत्व केले होते.

द्रोणाचार्य पुरस्कार हा विविध खेळांमधील प्रशिक्षकांना त्यांच्या वर्षभरातील तसेच पूर्वीची कामगिरी लक्षात घेऊन दिला जातो. तसेच ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार हा खेळाडूच्या एकूण कारकिर्दीतील कामगिरी ध्यानात घेऊन प्रदान केला जातो. यावर्षीचे पुरस्कार 25 सप्टेंबर रोजी वितरित करण्यात येणार आहेत. पुरस्कार वितरण समारंभ प्रतिवर्षी राष्ट्रीय क्रीडादिनी, 29 ऑगस्ट रोजी आयोजित केला जातो. मात्र आशियाई स्पर्धा 2 सप्टेंबरपर्यंत चालू असल्याने या तारखेत बदल करण्यात आला आहे. 

पुरस्कार निवड समितीत राष्ट्रकुल स्पर्धेतील माजी सुवर्णपदक विजेता समरेश जंग आणि बॅडमिंटन खेळाडू अश्‍विनी पोनप्पा यांच्यासह माजी मुष्टियुद्ध प्रशिक्षक जी. एस. संधू, हॉकी प्रशिक्षक ए. के. बन्सल, तिरंदाजी प्रशिक्षक संजीवा सिंग, “साई’चे विशेष महासंचालक ओंकार केडिया आणि संयुक्‍त सचिव इंदर धामिजा यांचा समावेश आहे. तसेच दोन क्रीडा पत्रकार व “टॉप’चे कार्यकारी प्रमुख कमांडर राजेश राजगोपालन यांनाही या समितीत स्थान देण्यात आले आहे.