राफेल नदालने जिंकले 16 वे ग्रँड स्लॅम

0
74

स्पेनच्या रॅफेल नदालने यूएस ओपनचे विजेतेपद पटकावत कारकिर्दीत 16 वे गँड स्लॅम विजेतेपद मिळविले.

दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनवर मात करून जगातील अव्वल नामांकित टेनिस खेळाडू स्पेनच्या राफेल नदालने यूएस ओपनचे एकेरीतील विजेतेपद मिळवले आहे. 31 वर्षीय नदालने न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात अँडरसनवर 6-3, 6-3, 6-4 अशा सेटमध्ये मात केली.

यूएस ओपनचा नदाल तिसऱ्यांदा चँपियन बनला आहे. त्याचे हे १६ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद असून ग्रँड स्लॅम विजेतेपदाच्या बाबतीत नदालच्या पुढे केवळ स्विर्त्झलँडचा स्टार खेळाडू रॉजर फेडरर आहे. फेडररच्या नावावर १९ ग्रँड स्लॅम विजेतेपद आहेत. यावर्षी जूनमध्ये नदालने फ्रेंच ओपनचेही विजेतेपद पटकावले होते. चार वर्षानंतर नदालने एका सीझनमध्ये दोन ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवले आहेत. राफेल नदालने यापूर्वी २०१० व २०१३ मध्ये यूएस ओपन जिंकले आहे. नदालला यूएस ओपनमध्ये ३.७ मिलियन यूएस डॉलरचे बक्षीस मिळाले आहे. फेडररने आतापर्यंत 19 ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळविलेली आहेत. या वर्षातील नदालने मिळविलेले हे पाचवे विजेतेपद आहे. नदालने आतापर्यंत बक्षिसाच्या माध्यमातून मिळविलेली रक्कम ही 90 मिलियन अमेरिकन डॉलर इतकी झाली आहे. 

राफेल नदाल 

 नदाल हा स्पेनचा एक टेनिसपटू आहे. सध्या नदाल एटीपी क्रमवारीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. अनेक टेनिस तज्ज्ञांच्या मते नदाल आजतागायत झालेल्या सर्वोत्तम टेनिस खेळाडूंपैकी एक आहे. रफायेल नदालने आजवर 19 ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा व  जिंकल्या आहेत. २००८ साली झालेल्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्याने स्पेनसाठी सुवर्णपदक पटकावले. 2010यु.एस. स्पर्धा जिंकून नदालने चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम पूर्ण केला. हा पराक्रम साधणारा खुल्या टेनिस काळामधील नदाल हा केवळ7वा व वयाने सर्वात लहान टेनिसपटू आहे.