राज्यातील अनाथांना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये १% समांतर आरक्षण

0
37

राज्यातील अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात एक टक्का समांतर आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे अनाथ मुलांना शिक्षण तसेच नोकऱ्यांत आरक्षण मिळणार आहे. अनाथ मुलांचे पुनर्वसन करणे तसेच त्यांचे भवितव्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने सरकारने घेतलेला हा निर्णय आहे.

# राज्यातील अनाथांना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये खुल्या प्रवर्गातून १% समांतर आरक्षण लागू करण्याचा शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला. 

# महिला व बाल कल्याण विभागाने जीआर काढून अनाथांना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये १ टक्का आरक्षणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. 

# अनाथ मुलांना त्यांचा संस्थेतील कालावधी संपल्यानंतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अनाथ मुलांची जात नक्की माहीत नसल्याने त्यांना कोणत्या एका विशिष्ट प्रवर्गात समाविष्ट करता येत नाही.

# त्यामुळे त्यांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलतींपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे त्यांच्या भावी आयुष्यात अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात एक टक्का समांतर आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

# या आरक्षणामुळे अनाथ मुलांच्या पुनर्वसनाला आणखी बळकटी मिळणार आहे.