राजर्षि शाहू सहकारी बँक राज्यातील प्रथम सर्वोत्कृष्ट बँक

0
20

ठेवीमध्ये व कर्जामध्ये झालेली वाढ, ग्रॉस एनपीए प्रमाण, सीआरअेआर, सी.डी.रेशोज, खर्चाचे खेळत्या भांडवलाशी असलेले प्रमाण, मिळविलेल्या नफयाचे खेळत्या भांडवलाशी प्रमाण, नवीन शाखा, मॉडर्न टेकनॉलाजी, इ. निकषांच्या आधारे पुणे येथील राजर्षि शाहू सहकारी बँकेस रू.600 ते 1000 कोटीच्या ठेवी गटामध्ये राज्यस्तरीय पातळीवरील
सर्वोत्कृष्ट बँक प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.

राजर्षि शाहू सहकारी बँक

दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्‍स फेडरेशन लि.मुंबई हे दरवर्षी महाराष्ट्र राज्यातील सहकारी बँकांनी केलेल्या वर्ष अखेरच्या कामकाजाच्या आकडेवारीच्या आधारावर बँकांना पुरस्कार देऊन सन्मानित करते. त्यामध्ये प्रामुख्याने – ठेवीमध्ये व कर्जामध्ये झालेली वाढ, ग्रॉस एनपीए प्रमाण, सीआरअेआर, सी.डी.रेशोज, खर्चाचे खेळत्या भांडवलाशी असलेले प्रमाण, मिळविलेल्या नफयाचे खेळत्या भांडवलाशी प्रमाण, नवीन शाखा, मॉडर्न टेकनॉलाजी, इ. निकषांच्या आधारे पुणे येथील राजर्षि शाहू सहकारी बँकेस रू.600 ते 1000 कोटीच्या ठेवी गटामध्ये राज्यस्तरीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट बँक प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.

या बँकेने याअगोदर सलग सहा वर्षे राज्यस्तरीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार मिळवून सर्वोत्कृष्ट पुरस्कारांची डबल हॅट्रिक साधलेली आहे. सन 2016-2017 चाही प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार बँकेस मिळाला असून राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराची परंपरा बँकेने सलग सातव्या वर्षीही कायम ठेवली आहे ही बाब बँकेच्या प्रगतीच्या दृष्टीने अत्यंतमहत्वाची व आनंददायी आहे. असे राज्यस्तरीय पातळीवरील सलग सात वर्षे गुणात्मक दृष्टया दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्‍स फेडरेशन लि.मुंबई यांचेकडून सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार मिळवणारी राजर्षि शाहू सहकारी बँक ही राज्यातील एकमेव सहकारी बँक असल्याचे नमूद केले.