रविंद्र मराठे पुन्हा बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य पदावर

0
202

डी. एस. कुलकर्णी (DSK) यांना कर्ज देताना नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांतून निर्दोष सुटलेले रविंद्र मराठे यांची 2 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

रविंद्र मराठे यांना जून, 2018 मध्ये डी. एस. कुलकर्णी यांच्या कर्जप्रकरणात निलंबित करण्यात आले होते.
पुण्यातील डीएसके ग्रुपला फसवणूकीच्या कर्जाची भरपाई केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती. ते आयपीसीच्या विविध कलम आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
पुणे पोलीसांनी आर्थिक गुन्हे शाखासंदर्भातील विशेष न्यायालयात नुकताच सादर केलेल्या तपास अहवालात मराठे यांना क्लीनचीट दिली होती. डी. एस. कुलकर्णी कर्ज प्रकरणात मराठे यांचा संबंध नाही, असा अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला.
अलीकडेच बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली. ज्यामध्ये मराठे आणि आर. के. गुप्ता यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. SEBI (LODR) कायद्याअंतर्गत कलम 30 नुसार हा निर्णय घेतल्याचे बँक ऑफ महाराष्ट्रने सूचित केले आहे.