रजनीकांत मिश्रा एसएसबीचे महासंचालक

0
19

केंद्र सरकारने देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न करताना नुकत्याच काही नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. १९८४ च्या तुकडीतील उत्तर प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी असलेल्या रजनीकांत मिश्रा यांची नुकतीच सशस्त्र सीमा बलाच्या महासंचालकपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली.

रजनीकांत मिश्रा

केंद्र सरकारने उत्तर प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी असलेल्या रजनीकांत मिश्रा यांची नुकतीच सशस्त्र सीमा बलाच्या महासंचालकपदी नियुक्ती केली आहे. मिश्रा 31 ऑगस्ट 2019 पर्यंत या पदावर राहणार आहेत. मिश्रा हे मूळचे बिहारचे असून त्यांची 2012 मध्ये सीमा सुरक्षा दलात महानिरीक्षकपदावर नियुक्ती करण्यात आली होती. मिश्रा यांना अलीकडेच बीएसएफचे विशेष महासंचालकपदही बहाल करण्यात आले होते. नोव्हेंबर 2014 मध्ये त्यांच्यावरील जबाबदारी आणखी वाढविताना त्यांना अतिरिक्त महानिदेशकपदावर बढती देण्यात आली होती. 

सशस्र सीमा दल

सशस्त्र सीमा बल हे भारतातील केंद्रीय सशस्त्र पोलीस दल. सीमा सशस्त्र बलाच्या जवानांवर उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्किम, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये शांतता, सुरक्षा, राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देणे, सामाजिक बंधुभाव आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते. तसेच विदेशातून केल्या जाणाऱ्या तस्करीवरही सशस्त्र सीमा बल लक्ष ठेवून असते.