येत्या २७ जुलैला शतकातील सर्वात प्रदीर्घ चंद्रग्रहण

0
17

चालू शतकातील सर्वात जास्त काळाचे चंद्रग्रहण येत्या २७ जुलैला देशाच्या सर्व भागांतून दिसणार आहे. त्याचा कालावधी १ तास ४३ मिनिटे असणार आहे. या वेळी चंद्र लालसर रंगाचा दिसणार असून, त्याला ब्लड मून असे म्हणतात. बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ इंडामेंटल रीसर्च व एमपी बिर्ला तारांगणाचे संचालक देबीप्रोसाद दुआरी यांनी सांगितले, की भारतातील खगोल शौकिनांना हे ग्रहण म्हणजे पर्वणी असणार आहे. खग्रास व खंडग्रास असा दोन्ही अवस्थेत हे ग्रहण देशात सर्वत्र दिसणार आहे.

बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ इंडामेंटल रीसर्च व एमपी बिर्ला तारांगणाचे संचालक देबीप्रोसाद दुआरी यांनी सांगितले, की भारतातील खगोल शौकिनांना हे ग्रहण म्हणजे पर्वणी असणार आहे. खग्रास व खंडग्रास असा दोन्ही अवस्थेत हे ग्रहण देशात सर्वत्र दिसणार आहे.

दक्षिण अमेरिका, आफ्रिका, मध्यपूर्व व मध्य आशियातूनही ग्रहण दिसेल. हे दीर्घकाळाचे चंद्रग्रहण असून ते १ तास ४३ मिनिटे चालेल. खंडग्रास ग्रहण तासाभरापेक्षा जास्त काळ चालेल. २७ जुलैला खंडग्रास ग्रहण रात्री ११.५४ वाजता सुरू होईल व खग्रास चंद्रग्रहण २८ जुलैला पहाटे १ वाजता सुरू होईल, पहाटे १.५२ वाजता चंद्र काळा दिसेल. ती अवस्था पहाटे २.४३ पर्यंत राहील. यानंतर चंद्र खंडग्रास अवस्थेत पहाटे ३.४९ वाजता दिसेल. २७ जुलैला चंद्र पृथ्वीच्या छायेच्या मध्यातून मार्गक्रमण करील.