यूएईकडून मोदींना सर्वोच्च नागरी सन्मान; ‘या’ पदकाने होणार गौरव

0
159

संयुक्त अरब अमिरातकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘झाएद पदका’नं सन्मान करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही देशांमधील संबंध एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचले. यामध्ये मोदींचा मोठा वाटा असल्याने त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आले.

दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी मोदींनी केलेल्या प्रयत्नांची दखल संयुक्त अरब अमिरातकडून घेण्यात आली आहे. मोदींना संयुक्त अरब अमिरातचा हा सर्वोच्च नागरी सन्मान दिला जाणार आहेयाआधी महाराणी एलिजाबेथ, जॉर्ज डब्ल्यू बुश, व्लादिमीर पुतिन, निकोलस सरकोजी, क्षी जिनपिंग आणि अँजेला मर्केल यांना ‘झाएद पदका’नं गौरवण्यात आले आहे.

संयुक्त अरब अमिरातकडून दिले जाणारे ‘झाएद पदक’ बहुतांशवेळा पी-5 देशांच्या प्रमुखांना दिलं गेलं आहे. पी-5 मध्ये चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिकेचा समावेश होतो. मात्र आता या राष्ट्रप्रमुखांच्या यादीत मोदींच्या नावाचा समावेश झाला आहे. दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ झाल्यानं हा सन्मान मोदींना दिला जात असल्याचं यूएईनं म्हटलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही देशांमधील व्यापारी आणि सामरिक संबंध अधिक घनिष्ठ झाले आहेत. विविध क्षेत्रांमधील सहकार्यदेखील वाढीस लागल्याचा उल्लेख यूएईनं केला आहे.