मोरोक्को २० वर्षांनी विश्वचषकासाठी पात्र

0
17

आयव्हरी कोस्टवर २-० असा विजय मिळवत मोरोक्कोने २०१८च्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली. तब्बल २० वर्षांनंतर ते पात्र ठरले आहेत.

पहिल्या सत्रात नॅबिर डिरॅर (२५व्या मिनिटाला) आणि मेढी बेनाटियाने (३०व्या मिनिटाला) पाच मिनिटांच्या फरकाने दोन गोल करत मोरोक्कोला आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी निर्णायक ठरली. या विजयासह त्यांनी ‘क’ गटात अव्वल स्थान मिळवले. तसेच आगेकूच केली. मोरोक्कोने सर्वाधिक १२ गुण मिळवलेत. मोरोक्कोने यापूर्वी १९९८मध्ये विश्वचषक स्पर्धेत सहभाग दर्शवला होता.

टय़ुनिशियाची आगेकूच

लिबियाविरुद्धची लढत गोलशून्य बरोबरीत सोडवताना टय़ुनिशियाने ‘अ’ गटात अव्वल स्थान मिळवत फिफा विश्वचषक स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. या बरोबरीनंतर टय़ुनिशियाने काँगोला मागे टाकत अव्वलस्थानी झेप घेतली.

आर्यलडने डेन्मार्कला गोलशून्य बरोबरीत रोखले

फिफा विश्वचषक पात्रता फेरीत शनिवारी पहिल्या टप्प्यामध्ये आर्यलडने डेन्मार्कला गोलशून्य बरोबरीत रोखले.