मोदी-जिंगपिंग भेटीत सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती

0
22

चीनच्या शियामेनमधील ब्रिक्स संमेलनचा आज अखेरचा दिवस आहे. डोकलाम वादानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. या बैठकीत दोन्ही देशांच्या सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याबाबत सहमती झाली.

परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, “सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे. भविष्यात दोन्ही देशांमध्ये कोणतेही मतभेद झाले तरी त्याचं रुपांतर वादामध्ये होऊ द्यायचं नाही, यावरही दोन्ही देशांनी पाठिंबा दर्शवला आहे. या भेटीत पंतप्रधान मोदींनी ब्रिक्स संमेलनासाठी चीनला शुभेच्छा दिल्या. ब्रिक्सला प्रासंगिक बनवण्यासाठी हे संमेलन यशस्वी ठरलं. यामुळे ब्रिक्स देशांमधील संबंध आणखी दृढ झाले आहेत, असं मोदी म्हणाले. सर्व देशांमध्ये विकास आणि शांतता कायम ठेवण्यासाठी ब्रिक्स देशांना एकजूटीने रहावे लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेसाठी चीनमध्ये झालेल्या बैठकीत बोलताना सांगितले. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग म्हणाले की, “चीन आणि भारत प्रमुख शेजारी देशत आहेत. दोन्ही विकसनशील आणि उदयोन्मुख देश आहेत. चीन आणि भारताने एकत्र मिळून पंचशील करारा अंतर्गत काम करायला तयार आहेत.”

BRICS परिषद 

“ब्रिक्स”( BRICS ) हे भारत, ब्राजील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या शिखर संघटनेचे संक्षिप्त नाव आहे. सुरुवातीला फक्त चार देश या संघटनेचे सदस्य होते आणि “ब्रिक” या संक्षिप्त नावाने ओळखले जात होते. २०११मध्ये दक्षिण आफ्रिका समाविष्ट झाल्यावर संघटनेचे नाव ब्रिक्स झाले. सर्वात पहिली ब्रिक्स परिषद रशियामध्ये झाली. दिमित्री मेदवेदेव यांनी त्याचे प्रतिनिधित्व केले होते. आठवी ब्रिक्स परिषद ही भारतामध्ये झाली होती. नरेंद्र मोदींनी प्रतिनिधित्व केले होते.