मोदी केअर योजनेंतर्गत होणार १ लाख १० हजारात बायपास

0
21

१३५२ प्रकारच्या तपासणी व शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात पाच लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य विम्याचे संरक्षण देणा-या केंद्र सरकारच्या मोदी केअर योजनेंतर्गत उपलब्ध हाेणार असून नुकतेच त्याचे दर जाहीर झाले आहेत. या योजनेत गुडघा प्रत्याराेपणासाठी ९० हजार रुपये, ४० हजारांत स्टेंट तर एक लाख १० हजार रुपयांत बायपास शस्त्रक्रिया हाेणार आहे. या योजनेत दिल्लीचे राज्य सरकारही सहभागी हाेणार आहे.

याबाबत माहिती देताना ‘नॅशनल हेल्थ प्राेटेक्शन मिशन’चे (एनएचपीएम) सीईओ डॉ. इंद्रभूषण यांनी सांगितले, केंद्रीय आरोग्य योजनेपेक्षाही (सीजीएचएस) या योजनेतील प्राेसिजर, शस्त्रक्रिया व तपासणीचे दर कमी आहेत. मंत्रालयाच्या वेबसाइटवर व एनएचपीएमच्या पाेर्टलवर त्याची यादी अपलाेड केली जाईल.

आरोग्य मंत्रालयाने खासगी रुग्णालयांना मोदी केअर योजनेत जाेडण्यासाठी व रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी खासगी रुग्णालयांना ३० % इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय घेतला आहे. एनएबीएच मान्यताप्राप्त रुग्णालयांना निश्चित केलेल्या दरापेक्षा १० % जास्त रक्कम दिली जाईल. हा खर्च केंद्र व राज्य सरकार उचलेल. वैद्यकीय महाविद्यालयांनाही १० % इन्सेंटिव्ह मिळेल. या सर्व सुविधा मागास भागातील रुग्णालयात असतील तर अशा रुग्णालयांना ३० टक्के इन्सेंटिव्ह मिळेल.