मोटर रेसिंगपटू चेतन कोरडाला ‘क्युनेट’ ने प्रायोजकत्व दिले

0
18

आशियातील थेट विक्री क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘क्यूनेट’ने दोन्ही कृत्रिम (सिंथेटिक) पाय असलेला मोटर रेसिंग स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवरील विजेता चेतन कोरडा याला एमआरएफ एफएमएसआय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आणि फॉर्म्युला मास्टर टेस्टिंग कार्यक्रमासाठी प्रायोजकत्व दिले आहे.

चेतन कोरडा हा सिंथेटिक प्रकारचे कृत्रिम पाय लावून मोटार रेसिंग सारख्या साहसी खेळात यशस्वी ठरलेला जगातील पहिला मोटार रेसिंग ड्रायव्हर आहे. तो आशियातील पहिला आणि जगातील दुसरा रेसर आहे जो कृत्रिम पाय लावून या क्षेत्रात कार्यरत आहे. (अलेक्स झनार्दिं हा पहिला ड्रायव्हर आहे). जन्मतःच व्यंग असल्याने चेतनचे  दोन्ही पाय काढून टाकावे लागले.