मुगुरुझा वर्षातली सर्वोत्तम टेनिसपटू

0
31

स्पेनच्या गार्बिन मुगुरुझाची महिला टेनिस संघटनेने (डब्ल्यूटीए) वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड केली आहे. मुगुरुझाने वर्षअखेरीस क्रमवारीत अग्रस्थान मिळविले तर त्याआधी विम्बल्डन स्पर्धाही तिने जिंकली आहे.

स्पेनच्या गार्बिन मुगुरुझाची महिला टेनिस संघटनेने (डब्ल्यूटीए) वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड केली आहे. मुगुरुझाने वर्षअखेरीस क्रमवारीत अग्रस्थान मिळविले तर त्याआधी विम्बल्डन स्पर्धाही तिने जिंकली आहे. अग्रमानांकन मिळविणे व विम्बल्डन स्पर्धा जिंकणे असा पराक्रम करणार्‍या अरांत्झा सांचेझ व्हिकारिओन नंतर मुगुरुझा ही स्पेनची दुसरी महिला टेनिसपटू आहे. 

सेरेना व व्हीनस या विल्यम्स भगिनींवर ग्रँडस्लॅम स्पर्धेत मात करणारी ती पहिलीच खेळाडू ठरली आहे. २०१६ मध्‍ये तिने फ्रेंच ओपन स्पर्धेत सेरेनाला हरवून जेतेपद पटकावले. 

मार्टिन हिंगीस व चॅन युंग जॅन यांची डब्ल्यूटीएची वर्षातील सर्वोत्तम दुहेरीची जोडी म्हणून निवड करण्यात आली. अमेरिकन ओपनसह या जोडीने वर्षभरात ९ अजिंक्‍ययपदे पटकावली आहेत. 

गार्बीन्या मुगुरुझा  

गार्बीन्या मुगुरुझा ही एक व्यावसायिक स्पॅनिश टेनिसपटू आहे. २०१२ सालापासून व्यावसायिक स्पर्धांमध्ये खेळत असलेली मुगुरुझा सध्या स्पेनमधील अव्वल क्रमांकाची टेनिस खेळाडू आहे. मुगुरुझाने २०१५ सालच्या विंबल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली तर २०१६ फ्रेंच ओपन स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवले. मुगुरुझा २०१७ विम्बल्डन स्पर्धेची विजेती होती.

कारकीर्द 

ग्रेंड स्लाम एकेरी अंतिम फेऱ्या 

निकाल  वर्ष  स्पर्धा  प्रकार  प्रतिस्पर्धी  स्कोअर 
उपविजेती  २०१५  विम्बल्डन  गवताळ  सेरेना विल्यम्स  ४-६, ४-६ 
विजयी  २०१६  फ्रेंच ओपन  क्ले  सेरेना विल्यम्स  ७-५, ६-४