मीराबाई चानूचा विश्‍वविक्रम

0
11

भारताच्या सैखोम मीराबाई चानू हिने जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये विश्‍वविक्रम नोंदवून जेतेपदाला गवसणी घातली आहे. तिने 48 किलो वजनी गटात 194 किलो (स्नॅचमध्ये 85 आणि क्लीन-जर्कमध्ये 109 किलो) वजन उचलून भारताला दोन दशकांनंतर सुवर्णपदक मिळवून दिले आहे. अशी कामगिरी करणारी चानू दुसरी भारतीय वेटलिफ्टर ठरली आहे. 22 वर्षांपूर्वी कर्नाम मल्लेश्‍वरी हिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती.

# भारताच्या मीराबाई चानू हिने जागतिक विक्रमासह जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्‍यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. कर्णम मल्लेश्‍वरीनंतर अशी कामगिरी करणारी मीराबाई केवळ दुसरीच वेटलिफ्टर ठरली. 

# अमेरिकेत ॲनाहेम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मीराबाईने एकूण १९४ किलो वजन उचलून जागतिक विक्रमाचीही नोंद केली. तिने स्नॅच प्रकारात ८५ आणि क्‍लिन अँड जर्क प्रकारात १०९ किलो वजन उचलले. तिने थायलंडच्या सुकचारोएन थुन्या हिला (१९३) अवघ्या एका किलोने मागे टाकले. सेग्युरा ॲना (१८२ किलो) ब्राँझपदकाची मानकरी ठरली. 

# चानू ४८ किलो वजनी प्रकारात सहभागी झाली होती. तिची सुरवात (८५ किलो) समाधानकारक होती. मात्र, नंतर तिने १०९ किलो वजन उचलून जाणकारांचे अंदाज चुकवत सुवर्णपदकावर नाव कोरले.

# जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणारी ही भारताची दुसरी खेळाडू ठरली. यापूर्वी कर्णम मल्लेश्‍वरी हिने अशी कामगिरी १९९४ आणि १९९५ मध्ये केली होती. 

# सप्टेंबरमध्ये चानूने राष्ट्रकुल अजिंक्‍यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली होती.

# भारताची आणखी एक आघाडीची खेळाडू कुंदराणी देवी हिने कारकिर्दीत अनेक पदके मिळविली. यात रौप्यपदकांचा अधिक वाटा होता.