मिथाली राज 200 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळणारी पहिली खेळाडू बनली

0
429

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिथाली राज 200 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळणारी पहिली भारतीय खेळाडू बनली आहे. फेब्रुवारी 1, 2019 रोजी हॅमिल्टनमधील न्यू झीलँडच्या महिलांविरुद्ध सामन्यात तिने हा विक्रम नोंदविला.

• भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या न्युझीलँडच्या दौऱ्यावर आहे. मालिकेच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळतांना मिथाली 28 चेंडूत फक्त 9 धावा काढू शकली.
• भारतीय महिला संघाने तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये मालिका 2-1 अशी जिंकली आहे.
• दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध मिथालीने नाबाद 63 धावा केल्या होत्या.
• क्रिकेट कारकिर्दीतील 200 एक दिवसीय सामन्यात तिने 51.3 च्या सरासरीने एकूण 6622 धावा केल्या आहेत.

मिथाली राज :

• मिथालीने 25 जून 1999 रोजी मिल्टन केनेसमध्ये आयरलैंडविरुद्ध आपल्या कार्यकिर्दीच्या पहिल्या सामन्यात 114 धावा काढल्या. भारत या सामन्यात 161 धावांनी विजयी झाला होता.
• तिच्या एकदिवसीय सामन्यात पदार्पणानंतर, भारत महिलांनी या फॉर्ममध्ये 213 सामने खेळले आहेत. त्यात 13 सामने वगळता मिथाली बाकीच्या प्रत्येक सामन्याचा भाग राहिली आहे.
• ती एकदिवसीय सामन्यातील आघाडीची धावपटू आहे. सध्या तिच्या नावावर 6622 धावा आहेत.
• 36 वर्षांची मिथाली हा खेळ 19 वर्षे आणि 219 दिवसांपासून देशासाठी खेळत आहे.
• मिथालीच्या नावावर एकदिवसीय सामन्यातील खूप रेकॉर्ड आहेत.
• एकदिवसीय सामन्यांमध्ये सातत्याने सलग सात अर्धशतक झळकावणारी ती पहिला खेळाडू आहे.
• मिथाली एकमात्र खेळाडू (पुरुष किंवा महिला) आहे ज्याने भारताचे एकापेक्षा जास्त आयसीसी ओडीआई विश्वचषक स्पर्धेत कर्णधारपद भूषविले आहे, 2005 आणि 2017 मध्ये ते दोनदा केले.
• मिथालीने 2002 मध्ये इंग्लंडविरूद्ध कसोटी सामन्यात आणि 2006 मध्ये टी-20 मध्ये पदार्पण केले.
• ती जगातील पहिली आणि एकमेव महिला क्रिकेट खेळाडू आहे जिने 6000 धावा केल्या आहेत.
• मिथालीला 2003 मध्ये अर्जून पुरस्कार आणि 2015 मध्ये पद्मश्री ने सन्मानित करण्यात आले आहे.