मिझोरामच्या राज्यपालपदी राजशेखरन

0
18

मिझोरामचे राज्यपाल म्हणून केरळचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष कुम्मानम राजशेखरन यांनी आज शपथ घेतली. येथील राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अजीत सिंह यांनी राजशेखरन यांना पदाची शपथ दिली.

या वेळी मिझोरामचे मुख्यमंत्री लाल थानहावला यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून राजशेखरन यांनी 1970 मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरवात केली. 2015मध्ये त्यांची भाजपचे केरळ प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2014 मध्ये केंद्रात एनडीएचे सरकार आल्यापासून मिझोरामचे राज्यपाल पद भूषविणारे राजशेखरन हे आठवे व्यक्ती आहेत. मावळते राज्यपाल लेफ्टनंट जनरल निर्भय शर्मा यांचा कार्यकाळ सोमवारी संपला.