माहिती अधिकारावरही जीएसटी

0
24

महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक मंडळाने माहिती अधिकाराच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या माहितीवर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लावला आहे. एमएसआरटीसीने माहिती अधिकारकर्त्यांकडून एकूण १८ टक्क्यांचा जीएसटी वसूल करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये राज्य आणि केंद्र सरकारचा प्रत्येकी ९ टक्के जीएसटी आहे.

माहितीचा अधिकार कायदा 

माहितीचा अर्थ हा कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य असा असून त्यामध्ये, अभिलेख, दस्तऐवज, ज्ञापने, ई-मेल, अभिप्राय, सूचना, प्रसिद्धीपत्रके, परिपत्रके, आदेश, रोजवह्या, संविधा, अहवाल, कागदपत्रे, नमुने, प्रतिमाने (मॉडेल), कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील आधारसामग्री, फायलींवरचे अधिकाऱ्यांचे अथवा मंत्र्यांचे अभिप्राय होय. त्याकाळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यान्वये सार्वजनिक प्राधिकरणाकडून मिळविता येईल. माहितीचा अधिकार अधिनियम – २००५ हा कायदा १२ ऑक्टोबर, २००५ रोजी अंमलात आला. हा कायदा सर्वप्रथम स्वीडन मधे 1766 ला लागु झाला त्यानंतर भारत हा 12 ऑक्टोबर 2005 ला आशा प्रकारचा कायदा करणारा 54 वा देश ठरला.