मानवी शरीरात सापडला नवीन अवयव

0
47

मानवी शरीरात उदर पोकळीच्या आतील बाजूस असलेल्या दुपेडी आवरणात दडलेला व साध्या डोळ्यास न दिसणारा ‘मेसेन्टरी’ हा एक स्वतंत्र अवयव असल्याचे वैज्ञानिकांनी चार वर्षांच्या संशोधनानंतर जाहीर केले आहे. अशा प्रकारे स्वतंत्रपणे गणल्या गेलेल्या ज्ञात मानवी अवयवांची संख्या ७९वर पोहोचली आहे.

आयर्लंडमधील विद्यापीठातील लिमरलिंक रुग्णालयात या अवयवाचा शोध जॉन केल्विन कॉफी यांनी लावला असल्याचा दावा लॅन्सेट गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि हिपॅटोलॉजीच्या पत्रिकेत करण्यात आला आहे. या अवयवाला अंत्रधर असे नाव देण्यात आले असून, ते शरीरातील उदरपोकळीच्या मागच्या आतड्यांना जोडणारी घडी आहे. शिवाय, संशोधकांना शरीरात अखंड आणि पूर्णपणे वेगळ्या प्रकारची संरचना आढळून आली, असाही उल्लेख या पत्रिकेत करण्यात आला आहे.

हे अवयव यापूर्वी शरीरात आढळून आले नाही आणि शरीरात नेमके याचे काय कार्य चालते, हे अद्याप माहीत नाही, असे कॉफी यांनी सांगितले. अंत्रधराचे कार्य काय आहे ? याचा अजून शोध चालू आहे. सध्या या अवयवाचे वर्गीकरण ओटीपोटात करू शकतो, असे कॉफींनी संशोधनात म्हटले आहे.