मादाम तुसादच्या संग्रहालयात योगगुरू रामदेवबाबांची प्रतिमा

0
24

योग शिबिराच्या निमित्ताने लंडन दौऱ्यावर असलेले योगगुरू रामदेवबाबा याचा मेणाचा पुतळा लंडनचा जगप्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयात बसविला जाणार आहे. त्यासाठी सोमवारी म्हणजे आज बाबा या संग्रहालयात तीन तास जाणार असून तेथे त्यांच्या शरीराची, चेहऱ्याची मापे घेण्याचे काम केले जाणार आहे.

बाबांचा पुतळा त्यानंतर तयार करून सहा महिन्यात संग्रहालयात बसविला जाणार आहे. या संग्रहालयात अनेक प्रसिद्ध भारतीयांचे पुतळे आहेत पण स्वामी विवेकानंद यांच्यानंतर साधू, संत, योगी, गुरु यामध्ये रामदेवबाबा दुसरे योगगुरू बनणार आहेत.

योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. भारतीय ऋषी परंपरा आणि संस्कृती गौरवशाली आहे. जगप्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयात रामदेवबाबांचा पुतळा उभारला जात आहे याचा भारतीयांना अभिमान आहे असे या संबंधी बोलताना पतंजली प्रवक्ते तीजारीवाला यांनी सांगितले. १९३५ साली फ्रांस मधून पलायन करून आलेल्या मेरी तुसाद यांनी हे प्रदर्शन सुरु केले होते.