माणिक भिडे यांना ‘पंडित भीमसेन जोशी पुरस्कार’ जाहीर

0
24

राज्य शासनाच्या वतीने भारतरत्न पं भीमसेन जोशी यांच्या नावे शास्रीय संगीतातील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जाणारा 2017-18 या वर्षीचा पुरस्कार जेष्ठ गायिका माणिक भिडे यांना जाहीर झाला आहे.

जयपूर-अत्रोली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका माणिक भिडे यांना २०१७-१८ सालचा भारतरत्न ‘पंडित भीमसेन जोशी’ जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये, मानचिन्ह आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

माणिक भिडे या मूळच्या कोल्हापूर येथील आहेत. जयपूर अत्रोली घराचे आद्यपुरुष उस्ताद अल्लादियॉ खाँ यांचे पुत्र उस्ताद मजी खाँ आणि भूर्जी खाँ यांची तालीम लाभलेले मधुकर सडोलीकर यांच्याकडे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. गोविंद भिडे यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या मुंबईत वास्तव्याला आल्या. तब्बल १५ वर्षे गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे शिष्यत्व पत्करून गानसाधना केली. त्यांच्या कन्या आणि प्रसिद्ध गायिका अश्विनी भिडे देशपांडे या त्यांच्या शिष्यांपैकीच एक आहेत.

भीमसेन जोशी पुरस्कार 

शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकाराला पं. भीमसेन जोशी यांच्या नावे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पाच लाख रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी हा पुरस्कार गानसरस्वती किशोरी आमोणकर, पं. जसराज, प्रभा अत्रे, पं. राम नारायण, परवीन सुलताना यांना प्रदान करण्यात आलेला आहे.