माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जींचे निधन

0
53

लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी (वय 89) यांचे आज (सोमवार) सकाळी निधन झाले.चॅटर्जी यांना मूत्राशयाशी संबंधित आजारानेही ग्रासले आहे. चॅटर्जी यांच्यावर डायलिसिसच्या माध्यमातून उपचार सुरु होते. सध्या त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

तब्बल दहा वेळा लोकसभेवर निवडून आलेले चॅटर्जी हे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचेदेखील सदस्य होते. चॅटर्जी यांनी 1968 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. 1971 मध्ये पहिल्यांदा ते लोकसभेवर निवडून गेले होते. सोमनाथ चॅटर्जी यांचे वडिल निर्मल चंद्र चॅटर्जी हे प्रसिद्ध वकील होते. अणु कराराच्या मुद्द्यावरून माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांचा सरकारचा डाव्या पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर चॅटर्जी यांनाही लोकसभा अध्यक्षपद सोडण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी पद न सोडल्याने पक्षातून त्यांना निलंबित करण्यात आले होते.