महिला पुरूष समान वेतन देणारा आईसलँड पहिला देश

0
15

महिला व पुरूषांना समान वेतन देण्याचा कायदा करणारा देश म्हणून आईसलँडने जगात पहिला देश बनण्याचा मान मिळविला आहे.

महिला व पुरूषांना समान वेतन देण्याचा कायदा करणारा देश म्हणून आईसलँडने जगात पहिला देश बनण्याचा मान मिळविला आहे. आज जगभरात सर्वत्र एकाच संस्थेत वा कंपनीत समान हुद्द्यावर व समान जबाबदारीचे काम करणार्‍या महिला व पुरूषांच्या वेतनात फरक केला जातो. समान कामासाठी महिलांना पुरूषांच्या १०० टक्के वेतनाच्या तुलनेत ८३ टक्के वेतन दिले जाते असे आकडेवारी सांगते. काही ठिकाणी हे प्रमाण ५० टक्के आहे.

अमेरिकेत समान वेतन संदर्भात थोडेफार प्रयत्न केले गेले मात्र तेथेही या संदर्भातला कायदा होऊ शकलेला नाही. आईसर्लंडमधील नव्या नियमानुसार आता खासगी कंपन्या तसेच संस्थांना त्याच्या कडे काम करत असलेल्या एकाच हुद्द्यावरच्या महिला व पुरूषांना समान वेतन दिले जात असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. ज्या कंपन्यातून २५ किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी आहेत त्यांना इक्वल पे प्रोग्रॅमखाली सर्टिफिकेट घ्यावे लागणार आहे.

‘महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांच्या वेतनासंबंधी काहीतरी ठोस करण्याची आवश्यकता आहे. समान अधिकार म्हणजेच मानवाधिकार असतात. महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांना समान संधी मिळेल, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यासाठी योग्य ते निर्णय घेण्यासाठी आम्ही बांधित आहोत. त्यानुसार आमच्याकडून कृती केली जाईल,’ असे आईसलँडचे सामाजिक व्यवहार आणि समानता मंत्री थोरस्टेइन विग्लुंडसन यांनी म्हटले आहे.