महावीर जन्मदिवस – 17 एप्रिल

0
172

24 व्या आणि शेवटच्या जैन तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्मदिवस 17 एप्रिलला देशभरात साजरा केला जातो.जैन लोकांसाठी हा सर्वात पवित्र दिवस आहे.भगवान महावीरांचे अनुयायी, उत्सव अर्पण करून, प्रसाद अर्पण करून आणि रथांच्या संमेलनात सहभागी होऊन हा उत्सव साजरा करतात.

  • जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर: ऋषभनाथ; प्रतीक: बुल
  • जैन धर्माचे अंतिम तीर्थंकर: महावीर; प्रतीक: सिंह
  • म्हणून त्यांना महावीर म्हटले जाते!
    भगवान महावीर यांचा जन्म बिहारमधील लिच्छिवी वंशाचे महाराज सिद्धार्थ आणि त्यांची पत्नी त्रिशाला यांच्या पोटी झाला. भगवान महावीर यांच्या लहानपणीचे नाव वर्धमान होते. वर्धमान यांनी ज्ञान प्राप्तीसाठी वयाच्या अवघ्या तीसाव्या वर्षी राजमहलातील सुख आणि वैभव याचा त्याग करुन तपोमय साधनेचा मार्ग अवलंबला. त्यानंतर सुमारे साडे बारा वर्ष त्यांनी साधना केली. त्यांचे जीवन कष्टाचे एक जिवंत उदाहरण आहे. त्यांनी तप आणि ज्ञानाच्या आधारे सर्व इच्छा आणि विकार यांच्यावर नियंत्रण मिळवले. त्यामुळे त्यांना ‘महावीर’ म्हणून ओळखले जावू लागले.