महाराष्ट्र बॅंकेच्या कार्यकारी संचालकपदी हेमंतकुमार टम्टा

0
246

सर्वात जुन्या सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांपैकी एक असलेल्या बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये तीन वर्षांच्या कालावधीसाठी कार्यकारी संचालक म्हणून हेमंतकुमार टम्टा रुजू झाले. त्यांनी दि. 31 डिसेंबर 2018 रोजी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.

1985 मध्ये परिवीक्षा अधिकारी म्हणून नियुक्‍त झाल्यानंतरच्या 33 वर्षांच्या कालावधीत बॅंकिंग क्षेत्रामध्ये त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या नियुक्‍ती पूर्वी ते कॅनरा बॅंकेमध्ये रिटेल विभागाचे नेतृत्व करीत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली कॅनरा बॅंकेने यामध्ये सर्वात जास्त वाढ नोंदविली होती.

हेमंतकुमार टम्टा यांनी त्यांच्या कार्यकाळात बॅंकिंगमध्ये विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत. बॅंकेच्या मूलभूत धोरणामध्ये सुधार करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. बॅंकिंग कार्यक्षेत्राच्या विविध अंगाचा त्यांना समृद्ध अनुभव असून कॅनरा बॅंकेच्या नागपूर, आग्रा येथील शाखा आणि प्रशासकीय कार्यालये तसेच दिल्लीचे प्रमुख म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. हेमंतकुमार यांना, एमबीए आणि आयबीसीएफ पदवी प्राप्त आहे.