महाराष्ट्राला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार

0
17

स्वच्छतेच्या बाबतीत विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्राला ‘स्वच्छताही सेवा’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी दिल्लीत आयोजित स्वच्छ भारत दिवस या विशेष संमारभात हा गौरव करण्यात आला.

महाराष्ट्राने स्वच्छतेच्या बाबतीत शहर व ग्रामीण भागात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल या समारंभात घेण्यात आली. ‘संकल्प से सिद्धी’ या पंधरवाड्यात राज्याने जे विविध उपक्रम राबविले व जनजागृती केली त्यामुळे देश पातळीवर सर्वाधिक गुण महाराष्ट्राला मिळाले. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग व नगर विकास विभागाने शहर व ग्रामीण भागात स्वच्छ महाराष्ट्रासाठी राबविलेला उपक्रम देशपातळीवर सर्वोत्कृष्ट ठरला. 

स्वच्छतेच्या बाबतीत विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्राला ‘स्वच्छताही सेवा’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी दिल्लीत आयोजित स्वच्छ भारत दिवस या विशेष संमारभात हा गौरव करण्यात आला. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल व नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.