महाराष्ट्राला विविध श्रेणीतील 3 ‘राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार’

0
19

महाराष्ट्राला विविध श्रेणीतील तीन राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. यामध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट पर्यटक गाईडच्या पुरस्काराने रामा खांडवाला यांना सन्मानित करण्यात आले. तर सर्वोत्कृष्ट एकल रेस्टॉरन्ट पुरस्कार मुंबईतील खैबर या रेस्टॉरन्टला मिळालेला आहे.

छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार

पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोत्कृष्ट सेवा पुरविल्याबद्दल मुंबईतील छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळाला वर्ष 2015-16 चा राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार देण्यात आला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळ हे दक्षिण अशियातील सर्वात मोठे दुसरे विमानतळ आहे. 2015 मध्ये या विमानतळाला गुणवत्ता नियंत्रणासाठी अंतराराष्ट्रीय विमानतळ परिषदेचा पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे

मुंबईच्या रमा खांडवाला यांना सर्वोत्कृष्ट पर्यटक गाईड राष्ट्रीय पुरस्कार

मुंबईच्या रमा खांडवाला यांना 50 वर्ष पर्यटक मार्गदर्शक म्हणुन निभावलेल्या कामाबद्दल सर्वोत्कृष्ट “पर्यटक मागदर्शक’ हा राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मा खांडवाला या वरिष्ठ पर्यटक गाईड आहेत. 

मुंबईतील खैबर रेस्टॉरन्टला सर्वोत्कृष्ट रेस्टॉरन्टचा एकल राष्ट्रीय पुरस्कार

मुंबईतील खैबर रेस्टॉरन्टला सर्वोत्कृष्ट रेस्टॉरन्ट या एकल राष्ट्रीय पुरस्काराने पर्यटन राज्यमंत्री के.जे अल्फोंस यांनी सन्मानित केले. या रेस्टॉरन्ट चे डिसाइन हे परमेश्वर गोदरेज यांनी केले असून या रेस्टॉरेन्टच्या आतील भिंतीवरील चित्रे ही जगप्रसिद्ध चित्रकार एमएफ हुसेन आणि एंजोली एला मेनन यांनी काढली आहेत.