महाराष्ट्राला “मनरेगा’चे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

0
383

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (मनरेगा) अंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते महाराष्ट्राला विविध श्रेणीत चार पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

विज्ञान भवनात केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध श्रेणीत एकूण 237 पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राला रोजगार हमी योजनेच्या उत्कृष्ट अंमलबाजवणीसाठी राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत आणि पोस्ट ऑफीस अशा चार श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले.

रोजगार हमी विभागाने आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये नैसर्गीक स्त्रोतांचे व्यवस्थापनांतर्गत एनआरएममध्ये एकूण 70 हजार 514 कामे पूर्ण केली आहेत. यासाठी 1451.74 कोटींचा व्यय झालेला आहे. एनआरएम अंतर्गत राज्य शासनाची महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना व मागेल त्याला शेततळे या योजना राबविण्यात आल्या व यामाध्यमातून मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे.

गडचिरोली जिल्हा हा मनरेगा अंतर्गत सर्वोउत्कृष्ट कार्य करणारा जिल्हा ठरला आहे.

नूतन प्रकाश यांना उत्कृष्ट डाकसेवक पुरस्कार

पुण्यातील एमपीटीए संस्थेला तृतीय पुरस्कार