महाराष्ट्रात ८६ अतिउच्च दाबाची वीज उपकेंद्रे उभारणार

0
15

महापारेषण येत्या पाच वर्षांत राज्यात ८६ अतिउच्च दाबाची उपकेंद्रे उभारणार असून, १४ हजार २५३ किलोमीटरच्या वाहिन्यांचे जाळे पसरवून राज्यातील नागरिकांना पूर्ण दाबाने आणि स्वच्छ वीज उपलब्ध करून देण्यात येईल.

# महापारेषणने पुढील पाच वर्षाचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात दुसरी वाहिनी ओढणे, पारेषणचे वीज तार बदलणे, नवीन व्होल्टेज विद्युत स्तर निर्माण करणे, क्षमतेत वाढ करणे, नवीन पारेषण वाहिनी जोड वाहिनी तयार करणे आदींचा समावेश आहे. या आराखड्यामुळे 30196 एमव्हीए क्षमता वाढ होणार आहे.

# तसेच 14253 किलोमीटर वीज वाहिन्या नवीन टाकल्या जातील. तसेच 30196 एमव्हीएची रोहित्र क्षमता राहणार आहे. या कामांसाठी 1365 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 

# पूर्ण दाबाने आणि स्वच्छ वीज उपलब्ध करून देण्यासाठी या आराखड्यांतर्गत 86 अतिउच्चदाब वीज उपकेंद्र उभारण्यात येणार आहेत.

# विदर्भातील अमरावती आणि नागपूर विभागात 25 केंद्रे, उत्तऱ महाराष्ट्रात 19 केंद्रे, मराठवाडा औरंगाबाद विभागात 14 उपकेंद्रे, उर्वरित महाराष्ट्र- वाशी, पुणे, कराड येथे 28 उपकेंद्रे उभारली जाणार आहेत. यापैकी अमरावती विभागात 5, औरंगाबाद 5, नागपूर 6, नाशिक 3, पुणे 4 आणि वाशी येथे 1 उपकेंद्राचे काम सुरु झाले आहे.

# महापारेषणने कोणतीही यंत्रणा निकामी न होता व तांत्रिक बिघाड न येता राज्याची उच्चतम विजेची 23 हजार मेगावॉटची मागणी यशस्वीपणे पूर्ण केली. आजही 25 हजार मेगावॉटपर्यंत वीज पारेषित करण्याची क्षमता पारेषण कंपनीची आहे.

# सध्या महाराष्ट्राची शेजारच्या अन्य राज्यांपेक्षा अधिक ऊर्जा पारेषित करण्याची क्षमता आहे. महाराष्ट्रात महापारेषणची 400 केव्ही व त्यावरील 32 उपकेंद्रे आहेत. अन्य राज्यांच्या तुलनेत ही संख्या जवळजवळ दुप्पट आहे. 220 केव्हीची 219 उपकेंद्रे आहेत.