महाराष्ट्रातील 3 लघुपटांना राष्ट्रीय पुरस्कार

0
57

दिव्यांग या विषयावरील राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत महाराष्ट्राच्या तीन लघुपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. पुण्यातील दंतवैद्यक व दिग्दर्शक डॉ. सुयश शिंदे यांच्या कर्णबधीर मुलावर आधारित ‘अजान’ या लघुपटाला ४ लाख रुपये आणि प्रशस्त‌‌पित्राने गौरविण्यात आले.

# मुंबईच्या ज्योत्स्ना पुथरा दिग्दर्शित ‘झेब्रा क्रॉसिंग’ या टीव्ही स्पॉटला अव्वल पुरस्कारासह ५ लाख रुपये आणि प्रशस्त‌पित्राने तर मुंबईच्याच सीमा आरोळकर दिग्दर्शित ‘धीस इज मी’ या टीव्ही स्पॉटला द्वितीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

# सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण आणि चित्रपट महोत्सव विभागाच्या वतीने सिरीफोर्ट येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘दिव्यांग सक्षमीकरण लघुचित्रपट स्पर्धा-२०१७’ चे सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांच्या हस्ते गुरुवारी पुरस्कार वितरण करण्यात आले.
 
# पुणे येथील दंतवैद्यक तथा दिग्दर्शक डॉ. सुयश शिंदे दिग्दर्शित ‘अजान’ या लघुपटासाठी त्यांना गौरविण्यात आले. ४ लाख रूपये आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या लघुपटात केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाच्या दिव्यांगाना शस्त्रक्रिया करण्यासाठी किंवा उपयोगी साधने खरेदीसाठीच्या (एडीआयपी) योजनेच्या लाभाबाबत जागृती करण्यात आली आहे.
 
 
# ज्योत्स्ना पुथरा दिग्दर्शित ‘डॉट’ या टीव्ही स्पॉटला यावेळी विशेष उल्लेखनीय पुरस्कारही प्रदान करण्यात आला.