महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार भविष्यातील नियोजित प्रकल्प

0
62

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांनुसार भविष्यातील प्रकल्पांचे नियोजन –

नागपूर जिल्हा – स्मार्ट सिटी निवड, मिहान प्रकल्प प्रगतिप्रथावर, एसईझेड [स्पेशल इकॉनॉमी झोन], बोईंग एमआरओ प्रकल्प, पतंजली फळ प्रक्रिया उद्योग प्रकल्प, मध्य भारतातील सगळ्यात मोठे लॉजिस्टिक हब, आयआयएम, एम्स रुग्णालय, ट्रिपल आयटी कॉलेज, रोबोटिक सेंटर, नॅशनल स्कुल कॉलेज, नागपूर मेट्रो प्रकल्प.

वर्धा जिल्हा – केंद्र शासनाने वर्धा जिल्हयातील सेलू तालुक्यात ड्रायपोर्टची घोषणा हे ड्रायपोर्ट जवाहरलाल नेहरू ट्रस्ट विकसित करणार आहे. या ड्रायपोर्टमुळे विदर्भातील उद्योग वाढीस लागतील.

चंद्रपूर जिल्हा – राष्ट्रीय दर्जाची वनप्रबोधिनी, विसापूर येथे राष्ट्रीय दर्जाची महाराष्ट्रातील दुसरी सैनिकी शाळा, विसापूर येथे भारतातील दुसरे मोठे बॉटनिकल गार्डन, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय दर्जा.

भंडारा जिल्हा – भंडारा जिल्हयातील पवनी तालुक्यातील वैनगंगा नदीवर उभारण्यात असलेला गोसीखुर्द हा राज्यातील एकमेव राष्ट्रीय प्रकल्प असून तो जून २०१९ पर्यंत पूर्ण होणार. या प्रकल्पाचा ९०% खर्च केंद्रपुरस्कृत आहे. या प्रकल्पामुळे एकूण १ लाख ९० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

* अमरावती जिल्हा – रेडिमेड गारमेंट प्रकल्प, दर्यापूर येथे मध प्रकल्प,  परतवाडा येथे फर्निचर प्रकल्प, वरुड येथे बहुविध संत्रा पदार्थ प्रकल्प, नांदगाव पेठ येथे वस्त्रोद्योग पार्क.

* अकोला जिल्हा – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चे चौपदरीकरण काम सुरु , अकोला ते हैद्राबाद राष्ट्रीय क्रमांक १६१ चे चौपदरीकरण, अकोला ते खांडवा ब्रॉड गेज प्रकल्पाचे काम सुरु, शिवानी विमानतळ विस्तारीकरण.

* वाशिम जिल्हा – नागपूर-मुंबई प्रस्तावित महाराष्ट्र कृषी समृद्धी महामार्गाचा १०० किलोमीटर मार्ग या जिल्हयातून जाणार आहे. हा प्रकल्प जिल्हाच्या विकासास मदत करेल.

* बुलढाणा जिल्हा –  नागपूर-मुंबई प्रस्तावित महाराष्ट्र कृषी समृद्धी महामार्गाचा ८७ किलोमीटर मार्ग या जिल्हयातून जाणार आहे. हा प्रकल्प जिल्हाच्या विकासास मदत करेल. महामार्गावर २ ठिकाणी स्मार्ट सिटीची निर्मिती.

* हिंगोली जिल्हा – गुरुत्वाकर्षण लहरींचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेतील हान्सफोर्ड आणि लिव्हिंग्स्टन येथे दोन प्रयोगशाळा उभारल्या असून अशी तिसरी प्रयोगशाळा भारतात होणार असून ती हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात होणार आहे.

नांदेड जिल्हा – राष्ट्रीय महामार्ग १६१ तसेच राष्ट्रीय महामार्ग ३६१ तुळजापूर – नागपूर या मार्गाचे चौपदरीकरण काम सुरु.

* औरंगाबाद जिल्हा – जिल्हयात नागपूर – मुंबई महाराष्ट्र कृषी समृद्धी महामार्ग नियोजित, स्मार्ट सिटी बांधण्यात येतील, औरंगाबाद जालना मार्गावर उद्योगनगरी नियोजित असून काम सुरु, डीएमआयसी अंतर्गत शेंद्रा बिडकीन आधुनिक औद्योगिक केंद्र व शहर.

* जालना जिल्हा – जालना येथे मोठा सिडपार्क नियोजित. शहराजवळच सिरसवाडी शिवारात २०० एकरवर इन्स्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी [आयसीटी] राष्ट्रीय संस्था उभारली जात आहे. दरेगाव येथे १८५ हेक्टरवर ड्रायपोर्ट उभारला जात आहे.  जिल्ह्यात खामगाव-लोणार-मंठा-परतूर-माजलगाव-कळंब-बार्शी-पंढरपूर-सांगोला हा राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दिंडी मार्ग म्हणून घोषित ४३० किलोमीटर मार्गासाठी ८६० कोटीची तरतूद. लोअर दुधना प्रकल्प. परतूर अंबा येथे ५०० एकरवर सिडकोचा गृहनिर्माण प्रकल्प नियोजित.

* धुळे जिल्हा – मनमाड-धुळे-इंदोर रेल्वेमार्ग, धुळे ते औरंगाबाद चौपदरीकरण, जिल्हयातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र ६ चे धुळे ते सुरत चौपदरीकरण सुरु.

* जळगाव जिल्हा – जळगाव येथे टिश्यू कल्चर संशोधन केंद्र, चाळीसगाव येथे लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय. जिल्हयात मेडिकल हबसाठी राज्याची मान्यता.

* नंदुरबार जिल्हा – जिल्हयात ६०० कोटी रुपये खर्चाचे ५०० खाटांचे रूग्णालय.

पुणे जिल्हा – स्मार्ट सिटी निवड, पुणे मेट्रो काम सुरु, लोहगाव विमानतळ विस्तारीकरण, भीमाशंकर व नरसिंहपूर देवस्थान विकास, पुण्यात आयटीच्या नवउद्योगासाठी इन्क्युबेशन सेंटरची स्थापना. पुरंदर येथे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ नियोजित.

* सोलापूर जिल्हा – स्मार्ट सिटी निवड, सोलापूर-हैद्राबाद, सोलापूर-पुणे, सोलापूर-विजापूर, सोलापूर-धुळे, सोलापूर-सांगली राष्ट्रीय महामार्गाचा विकास. पुणे-फलटण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग घोषित. यंत्रमाग विकासासाठी सोलापूर शहर मेगाक्लस्टर म्हणून विकसीत केले जाणार,

* सिंधुदुर्ग जिल्हा – सिंधुदुर्ग विमानतळ विकास.

* मुंबई जिल्हा – मुंबई मेट्रो, नरिमन पॉईंट ते कांदिवली सागरी किनारा मार्ग, शिवडी ते न्हावाशेवा सेतू प्रकल्प, शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारक, दादर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक, नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स.